ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

गावाची ओळख आणि आम्ही

आमचे गाव समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विकासाच्या वाटचालीने ओळखले जाते. आम्ही गावाच्या प्रगतीसाठी एकसंघ प्रयत्नशील असून प्रत्येक ग्रामस्थाचा अभिमान आहोत.

 

नियोजनबद्ध पायाभूत सुविधा व विकासाचे आदर्श मॉडेल

आपली शंका, सूचना किंवा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील फॉर्म भरा.
आपला संवाद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे व ग्रामविकासासाठी उपयोगी ठरेल.

जिल्ह्यात नंबर वनची मोहोर

पायाभुत सुविधांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत नंबर उन ठरलेले कडेगाव तालुक्यातील चिंचणी गाव है केवळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा आणि राज्यातही एक आदर्श गाव म्हणून नावारुपाला आले आहे. लोकसहभागाच्या बळावर आणि नियोजनबद्ध कार्यशैलीच्या जोरावर या गावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिक योगदान देत असल्यामुळे येथे राबवल्या आणाऱ्या योजना यशस्वी होत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासात माजी मंत्री स्वर्गीय आमदार डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार मोहनराव कदम यांचे मोठे योगदान राहिले आहे. आता पायाभूत सुविधांमध्ये सरपंच अँड रमेश मदने यांच्या नेतृत्वाखाली चिंचणी गाव राज्यभर नावलौकिक मिळवीत आहे.

ग्रामपंचायतीचे प्रभावी नेतृत्व

गेल्या काही वर्षात गावाने विकासाच्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सरपंच म्हणून अॅड, रमेश मदने यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गावाच्या विकासाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली गावातील पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधत विविध प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत

भौगौलिक आणि शेतीचा समृद्ध वारसा

चिंचणी गाव तीन बाजूनी बेलगंगा आणि सोनहीरा ओढा यांच्या पाण्याने वेढलेले आहे. संपूर्ण गावालील शेती ताकारी योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आली असून, इथली बागायती शेती तालुक्यातील एक महत्वाचा आर्थिक स्त्रोत ठरली आहे. पूर्वी उन्हाळ्यात गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते, मात्र लाकारी योजनेमुळे हे संकट कायमचे दूर झाले आहे.

ग्रामविकासाची शाश्वत जळजीवन योजना

सरपंच अँड रमेश मदने यांच्या कार्यकाळात जलजीवन योजनेतून नवी पाणीपुरवठा योजना आणि जलशु‌द्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. जो आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच, गावातील प्रत्येका रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक विकासाची संकल्पना प्रत्याक्षात आणली आहे. ओड्‌यांमध्ये कोप बंधारे उभारुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

शैक्षणिक आणि डिजिटल प्रगती

गावाने डिजिटल इंडियाची कास धरली असून, प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हणमंतनगर जिल्हा परिषद शाळा ही डिजिटल सेमी इंग्लिश शाळा असून, जिल्ह्यात एकमेव अशी प्राथमिक शाळा आहे जिथे नेमबाजीचे (अर्चरी) प्रशिक्षण दिले जाते. ग्रामपंचायत कार्यालयात ई-वाचनालय’ उभारण्यात आले असून, गावातील व्यापारी, दुकानदार आणि ग्रामस्थ यांना कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, ‘डिजिटल ग्राम’ संकल्पनेतून ५०० मीटर परिसरात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पर्यटनाच्या दिशेने नव्या वाटा

चिंचणी गावाला ग्रामीण पर्यटन गाव म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १५७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव येथे असून, या तलावावर बोटिंग सुविधा प्रस्तावित आहे. गावातील महादेव मंदिर, भवानी मंदिर, श्री दत्त मंदिर, हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर इत्यादी मंदिरांचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे. गणेशखिंड आणि शिवस्मारक परिसर सुशोभित करण्यात आला असून, येथील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

पर्यावरणपूरक आणि हरितऊर्जेचा अवलंब

गावात जैवविविधता आणि पर्यावरणपूरक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. गावातील अनेक घरांवर सौरऊर्जेची पॅनेल्स बसवण्यात आली असून, ३० कुटुंबांनी सोलर होम लाइट्सचा पूर्णतः अवलंब केला आहे. याशिवाय २०० कुटुंबांकडे सौरकंदील असून, संपूर्ण गाव स्वच्छ ऊर्जा वापराच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रभावी उपक्रम

गावात ग्रामीण रुग्णालय असून, ग्रामपंचायतकडून याला सर्वतोपरी मदत केली जाते. येथे उच्च दर्जाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे.

व्यसनमुक्ती

गावात व्यसनमुक्तीसाठी समाजप्रबोधन कार्यक्रम राबविले जातात.

स्वच्छता

संपूर्ण गावात भुयारी गटार योजनेतून गटारे बांधण्यात आली आहेत, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी फिरवली जाते.

एक आदर्श ग्राम म्हणून जिल्हयात मान्यता

चिंचणी गावाने सामाजिक, आर्थिक, औ‌द्योगिक आणि पर्यटनाच्या क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीच्या बळावर येथे राबवलेले उपक्रम यशस्वी ठरले असून, संपूर्ण जिल्ह्यात हे गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून ओळखले जात आहे. भविष्यात पर्यटन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विकास साधण्याचे गावकऱ्यांचे स्वप्न आहे. चिंचणीचा हा आदर्श मॉडेल इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. नियोजनबद्ध विकासाची दिशा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण म्हणून चिंचणी गावाची राज्यभर दखल घेतली जात आहे.

कडेगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात चिंचणी गावाने विकासाच्या दृष्टीने आदर्शवत व नियोजनबद्ध कार्यशैलीने वेगळा ठसा उमटविला आहे. ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना व उपक्रम है लोकसहभागातून साकार केले जातात. गावातील प्रत्येक नागरिक नवनव्या संकल्पनांना प्रतिसाद देत असल्याने सरपंच अॅड. रमेश मदने यांच्या नेतृत्वाखाली सर्व योजना यशस्वीपणे राबविल्या जातात.

शिवस्मारक आणि शिवजयंती सोहळा

चिंचणी गावातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान म्हणून ग्रामपंचायत परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे शिवस्मारक साकारण्यात आले असून, या परिसराचे सुशोभिकरण व विद्युतरोषणाई झाल्याने तो शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

विशेष म्हणजे, चिंचणी गावात दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात शिवजयंती सोहळा संपन्न होतो. संपूर्ण गाव एकत्र येऊन भव्य मिरवणुकीसह विविध सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात हजारो शिवभक्त सहभागी होतात, त्यामुळे शिवस्मारक परिसर गावाच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनले आहे.

पायाभूत सुविधा आणि विकास

चिंचणी गावाने पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक योजना आणि आधुनिकतेची सांगड घालत विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. या गावाला तीन बाजूंनी बेलगंगा व सोनहीरा ओढा पात्राने व्यापले आहे. गावातील शेती १०० टक्के ताकारी योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आली आहे. सोनहीरा खोऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी चिंचणी हे आदर्श ग्राम वसले आहे. डॉ. पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी चिंचणी गावच्या विकासासाठी वारंवार आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.

पर्यावरणपूरक प्रकल्प आणि पर्यटन विकास

चिंचणी गावातील हिरवीगार शेती, पुरेसा जलसाठा आणि सौरऊर्जेचा वाढता वापर यामुळे गावाच्या पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळाली आहे. बेलगंगा ओढा काठावर आकर्षक उ‌द्यान बांधून पर्यटनासाठी नवे दालन तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिंचणी तलाव आणि सोनहीरा-बेलगंगा ओढापात्राचा पर्यटनासाठी उपयोग करून पर्यटकांसाठी सुसज्ज असे ठिकाण निर्माण करण्याचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात चिंचणी गाव पर्यटनाच्या क्षेत्रातही नवी ओळख निर्माण करेल.

एकंदरीत, चिंचणी गावाचा सर्वांगीण विकास आदर्शवत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा आणि ग्रामसमृद्धी साधावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चिंचणी गावातील सांस्कृतिक परंपरेत दोन महत्त्वाच्या यात्रा विशेषत्वाने लक्ष वेधून घेतात.

श्रीराम रथोत्सव यात्राः महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर चिंचणी गावात श्रीराम रथोत्सव यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी, श्रीरामाच्या मूर्तीचे रथातून भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होते. पारंपारिक वाद्यवृंद, भक्तिगीते, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव अधिक रंगतदार बनतो. गावकऱ्यांच्या एकोपा आणि श्र‌द्धेचे प्रतीक म्हणून ही यात्रा ओळखली जाते.

गायकवाडसो पिरसाहेब उरूस यात्राः फाल्गुन महिन्यात गायकवाडसो पिरसाहेब उरूस यात्रा चिंचणी गावात आयोजित केली जाते. ही यात्रा धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे, जिथे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन पिरसाहेबांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करतात. उरुस दरम्यान, धार्मिक विधी, कव्वाली, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे गावात आनंद आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते. या दोन यात्रांमुळे चिंचणी गावाची सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होत आहे. कोट्यवधीच्या निधीतून गायकवाडसो पिरसाहेब परिसर सुशोभित केला आहे.

चिंचणी ग्रामपंचायतीचा राज्यास्तरावर सन्मान। "माझी वसुंधरा 5.0" स्पर्धेत राज्यात 12 वा क्रमांक

पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविणाऱ्या “माझी वसुंधरा 5.0” अभियानात चिंचणी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या तिमाहीत घेतलेल्या #ईप्लेज (हरित शपथ) संख्येनुसार राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी चिंचणी ग्रामपंचायतीने 12 वा क्रमांक मिळवला आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या नेतृत्वाखालील या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकसंख्येनुसार गट ठरवण्यात आले होते. या गटांमध्ये चिंचणी ग्रामपंचायतीने नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून प्रभावी कामगिरी केली. स्वच्छता, हरित उपक्रम आणि पर्यावरणपूरक शपथ यामधून चिंचणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ग्रामस्थांनी घेतलेल्या हरित शपथांचा हा विक्रम पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रतीक आहे. या उल्लेखनीय यशाब‌द्दल ग्रामस्थ, ग्रामसेवक, सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीमचे कौतुक होत आहे.

“हरित भविष्यासाठी चिंचणी सज्ज!” 

पायाभूत सुविधांमध्ये चिंचणी गावाचा जिल्ह्यात डंका

जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

चिंचणी गावाने ‘स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा’ या श्रेणीत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन मिळवले आहे. जिल्हा पंचायत कार्यप्रदर्शन मूल्यांकन समितीने (DPPAC) चिंचणी गावाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली आहे.

चिंचणी गावाने पायाभूत सुविधांच्या विकासात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गावातील रस्ते, जलसिंचन, वीजपुरवठा, आरोग्य केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे गावक-यांचा जीवनमान उंचावले आहे आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे.

ग्रामपंचायत, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे. गावातील महिलांनी स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून उ‌द्योजकता विकसित केली आहे, तर युवकांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनात वाढ केली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत चिंचणी गावाचे नामांकन हे त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. या यशामुळे इतर गावांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत चिंचणी (वांगी), ता. कडेगाव जि. सांगली

महाराष्ट्र (भारत)

(सोम-शनि) सकाळी ०९ ते सायंकाळी ०६

Scroll to Top