ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग

पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून ई-प्रशासनाची अंमलबजावणी, आणि लोकसहभागाच्या माध्यमातून समावेशक विकासाचा प्रयत्न केला जातो. ग्रामपातळीवर निर्णयप्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग हेच सशक्त ग्रामव्यवस्थेचे खरे बळ आहे.

 
  • ग्रामपंचायत चिंचणी (वांगी) कडील लेख संहिता मधील १ ते ३३ नमुने संगणीकृत केलेले आहे.
  • ग्रामपंचायतव्दारे देण्यात येणारे सर्व १९ दाखले प्रमाणपत्र संगणीकृत रोख व वितरीत केलेले आहे.
  • ग्रामपंचायतीशी संबंध नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर सेवा बीरसी संगणकामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात.
  • ग्रामपंचायतीची ग्रामसभांची माहिती एस.एम.एस व्दारे नागरिकांना देणेत येते.
  • ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर सर्व योजनांची खर्चासह माहिती दिली आहे.
  • १०० टक्के ग्रामस्थांनी आधारकार्ड काढले आहे.
  • जॉब कार्ड वाटप केले आहे.
  • आपले सरकार सेवा केंद्र मधून शासकीय सर्व दाखले दिले जातात.
  • ग्रामसभा – शासकिय नियमानुसार ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते. एकही सभा तहकुब नाही.
  • लोकसहभाग- मंदिर बांधकाम, तालीम बांधकाम, शाळा व हायस्कूल इमारत बांधकाम, विविध स्पर्धेचे आयोजन, स्वच्छता अभियान,
  • विविध शासकिय योजनेअंतर्गत येणारा निधी १००% खर्च
  • उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायत इमारत व इतर ग्रा.पं. जागेत २१ दुकान गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. तसेच वॉटर ए.टी.एम., जिल्हा बँकेसाठी ग्रा. पं. इमारतीमधील हॉल भाड्याने देण्यात आला आहे. तसेच पाण्याचा टँकर ग्रामस्थांसाठी मापक दरात उपलब्ध आहे.

चित्रफिती

Scroll to Top