स्वच्छता
स्वच्छता ही आरोग्यपूर्ण जीवनाची पहिली पायरी असून ती वैयक्तिक, घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ परिसर, नीटनेटकेपणा आणि योग्य कचरा व्यवस्थापन हे ग्रामस्वच्छतेचे मुख्य आधारस्तंभ आहेत.
- हागणदारी मुक्त गाव या अभियानांतर्गत घरोघरी शौचालय १००% पुर्ण केले आहे.
- गटारीची व सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे.
- प्रथमदर्शनी गाव चौक सजावट केले रंगरगोटी पूर्ण.
- कचरा कुंडी प्रत्येक चौकात ठेवली आहे.
- बंदिस्त गटारी बांधली त्यामुळे डासाचे प्रमाण घटले आहे.
- गाव हागणदारी मुक्त केल्याने साथीच्या रोगाचे प्रमाण घटले आहे.
- गावातील कचरा घंटागाडी व्दारे गोळा करून तो योग्य प्रकारे विल्हेवाट केली जाते. I
- स्वच्छतेचे संदेश प्रत्येक घरात दिले आहेत.
- प्लॅस्टिक बंदी करून ग्रामस्थान प्लॅस्टिक बंदीचे महत्व सांगितले आहे. दंडाची माहिती दिली आहे.
- तंबाखु, गुटका व दारू बंदी केली आहे.
- परिसर स्वच्छ करून वृक्षारोपन केले आहे.





