पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धन म्हणजे निसर्गसंपत्तीचे जतन व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न. वृक्षारोपण, पाणीसंधारण, प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि जनजागृतीद्वारे पर्यावरणाचे संरक्षण हा आमचा हेतू आहे.
- पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना (इकोव्हिलेज) पुरस्कार प्राप्त
- कुऱ्हाडबंदी ठराव, चराई बंदी, प्लॅस्टिक बंदी ठराव ग्रा.पं. मार्फत मंजूर करण्यात आला आहे.
- बिहार पॅटर्न पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
- गावात रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
- गावांच्या लोकसंख्ये एवढी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
- वृक्ष लागवडीची संगोपन ग्रा.पं. मार्फत केले जाते.
- प्लॅस्टिक बंदी- गावातील प्लॅस्टिक ग्रा.पं. मार्फत खरेदीकरून योग्य ती विल्हेवाट लावली जाते.


