ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

पायाभूत सुविधांमध्ये चिंचणी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

पंचायत राज दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स अंतर्गत पायाभूत सुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चिंचणी (वांगी) ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. चिंचणीचे सरपंच अॅड. रमेश मदने व सदस्य यांनी गावाच्या वतीने प्रमाणपत्र आणि वृक्ष स्वीकारले.

गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये झालेली प्रगती, ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामपंचायतीचे नियोजन यामुळे चिंचणी गावाने हा सन्मान जिद्दीने मिळवला आहे.

यावेळी सरपंच अॅड. मदने म्हणाले, हा पुरस्कार संपूर्ण चिंचणी गावाचा आहे. पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

चिंचणी ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल तालुक्यातून आणि जिल्ह्यातून कौतुक होत आहे. यावेळी उपसरपंच दत्तात्रय माने, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कदम, अशोक मदने, प्रमिला महाडीक, रूपाली थोरात, ग्रामसेवक सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading