ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

‘कचरामुक्त गाव’चा चिंचणी ग्रामपंचायतीचा निर्धार

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीने कचरामुक्त गाव साकारण्याचा निर्धार केला आहे.

चिंचणी येथील लोकनेते मोहनराव कदम सभागृहात ग्रामपंचायतीच्या पूढाकाराने आयोजित महिला मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली कदम यांच्या उपस्थितीत कचरामुक्त गाव संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला. गाव कचरामुक्त करून आदर्श गावाची निर्मिती कशी करता येईल, याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाटील यांनी माहिती दिली.

अधिक लोकसंख्या असलेले व घनकचरा व्यवस्थापनात आदर्शवत कामगिरी करीत असलेले चिंचणी हे पहिले गाव असून सर्वांनी या गावाचे अनुकरण करने काळाची गरज असल्याचे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन तज्ञ सुहास खांबे यांनी ओल्या कचन्यापासून घरच्या घरी खतनिर्मितीची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. ओला कचरा कुंडीत टाकून त्याचे विघटन करून त्याचे खतामध्ये रूपांतर करण्यासाठी घरोघरी  कचराकुंडी ४२ प्रकारचे बॅक्टेरिया जमलेली एक लिटर ची बाटली देण्यात आली, या कुंडीमामें ओला कचरा टाकून परीचणी साहनिर्मितीचे आवाहन ग्रामपंचायतीत करण्यात आहे.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading